'इम्रानशाही'

Pakistan
Pakistan

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सत्तासिंहासनासाठीचा अंतिम सामना जिंकल्याचा दावा आज माजी क्रिकेटपटू आणि ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केला. त्यांच्या पक्षाने आतापर्यंतच्या मतमोजणीत १२० जागा मिळवल्या आहेत. सत्तेच्या जवळ पोचताच इम्रान यांनी भारताविरोधात गरळ ओकली असून, काश्‍मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा करत त्यांनी चीनशी लगट करण्याचा प्रयत्न केला. भविष्यामध्येही आम्ही चीनची मदत घेतच राहू, अशी भारतविरोधी भूमिका त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात घेतली.

पाकिस्तानच्या ‘नॅशनल ॲसेंबली’तील एकूण सदस्य संख्या ३४२ सदस्य असून, त्यातील २७२ जागांवरील प्रतिनिधी थेटपणे निवडले जातात, साठ जागा या महिलांसाठी राखीव असतात, तर अन्य दहा जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी सोडण्यात आल्या आहेत. लष्कराच्या हातचे बाहुले बनलेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत ‘शरीफ’नीतीचे कुटिल डावपेच आणि हाफीज सईदच्या कडवट धर्मकारणावर मात करत इम्रान खान यांनी मोठी झेप घेतली. लष्कराच्या कृपाशीर्वादाने घोंघावलेल्या इम्रान वादळात नवाझ शरीफ आणि बिलावल भुत्तो यांची धूळधाण झाली. 

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात भारताविरोधात विखारी प्रचार करणाऱ्या इम्रान खान यांनी पुन्हा तोच सूर आळवला. नेहमीप्रमाणे त्यांनी काश्‍मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्यालाही हात घातला. पाकिस्तानातील सुधारणांना प्राधान्य देताना ‘‘ हैवानों का निझाम हटाकर इन्सानियत का निझाम लाना चाहता हूँ’’ असे भावूक उद्‌गारही त्यांनी या वेळी काढले.

इम्रान यांची मुक्ताफळे 
भारतीय माध्यमांनी मला व्हिलन केले
भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारणार
काश्‍मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन
भारत-पाकिस्तानने चर्चेसाठी एकत्र यावे
तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावले चालू
अल्लाहने २२ वर्षांनंतर सत्तेची संधी दिली
कराच्या पैशातून ऐशोआराम चालणार नाही
मानवतेच्या आधारावर पाकिस्तानची उभारणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com