मदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान फिरतायत देशोदेशी..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील आठवड्यात मलेशियास जाणार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्यासमोर सुरवातीपासून आर्थिक स्थैर्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

सध्याच्या आर्थिक वर्षात पाकिस्तानची वित्तीय तूट १२ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घ्याव्या लागणार्‍या कर्जावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. त्यासाठी सौदी अरेबिया, चीन आणि मलेशियासारख्या 'मित्र' देशांकडे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

याच महिन्याच्या सुरवातीस इम्रान खान यांनी चीनचा दौरा काढून त्यांच्याकडे मदत मागितली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने पाकिस्तानला सहा अब्ज डॉलरची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या महिन्यात इम्रान खान यांनी सौदी अरेबियाकडूनही सहा अब्ज डॉलरच्या मदतीचे आश्वासन मिळविले होते. 

आता २०-२१ नोव्हेंबर रोजी इम्रान खान मलेशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही त्यांच्याबरोबर असतील, असे सांगण्यात आले. मलेशियाचे पंतप्रधान महातिर महंमद यांच्यासह इम्रान खान यांची वैयक्तिक चर्चाही होणार आहे. 'इम्रान खान यांच्या दौर्‍यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील', अशी आशा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Prime Minister Imran Khan is asking for Financial help to other Countries