अस्वस्थ भारतीय प्रवाशाला मदत करण्यास पाकचा नकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

विपीन असे त्या भारतीय प्रवाशाचे नाव आहे. विपीन आपल्या मित्रांसह तुर्कीहून विमानाने येत होता. त्यादरम्यान अचानकपणे त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे वैमानिकाने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. विपीन हा तब्बल तीन तास लाहोर विमानतळावर उपचारांअभावी तडपडत राहिला होता. मात्र, त्याला पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर कोणतीही तत्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली नाही.

नवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग केल्यानंतर पाकिस्तानने त्या भारतीय प्रवाशावर वैद्यकीय उपचार करण्यास नकार दिला. या घटनेनंतर पाकिस्तानच्या वागणुकीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

विपीन असे त्या भारतीय प्रवाशाचे नाव आहे. विपीन आपल्या मित्रांसह तुर्कीहून विमानाने येत होता. त्यादरम्यान अचानकपणे त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे वैमानिकाने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. विपीन हा तब्बल तीन तास लाहोर विमानतळावर उपचारांअभावी तडपडत राहिला होता. मात्र, त्याला पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर कोणतीही तत्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली नाही. त्यानंतर अखेर तुर्की विमानाने त्याला पुन्हा एकदा दिल्ली विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्याला गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.  

दरम्यान, याबाबत विमानातील सहप्रवासी असलेल्या जालंधर येथे राहणाऱ्या पंकज मेहता यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan refuse treatment for Indian passenger in Lahore