भारताने आत्मपरीक्षण करण्याची गरज...

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया झोंबली
pakistan Religious exploitation temple attack in Karachi Arindam Bagchi Islamabad
pakistan Religious exploitation temple attack in Karachi Arindam Bagchi Islamabad India and Pakistan

इस्लामाबाद : कराचीतील मंदिरावरील हल्ल्यानंतर अल्पसंख्याकाचे धार्मिक शोषण करणारी आणखी एक घटना अशा शब्दांत भारताने दिलेली प्रतिक्रिया पाकिस्तानला झोंबली आहे. अल्पसंख्याकांना त्रास होत असल्याचा आरोप नाकारताना पाकिस्तानने भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अल्पसंख्याकाच्या स्थितीबाबत भारताने आत्मपरीक्षण करावे, असा अनाहूत सल्ला दिला आहे. कराची शहरातील कोरांगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मरिमाता मंदिरात बुधवारी अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करत मूर्तींची विटंबना केली होती. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले, की पाकिस्तानात अल्पसंख्याकाचे नियोजनबद्धरित्या धार्मिक शोषण केले जात आहेत.

पाकिस्तान सरकारने अल्पसंख्याकाच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घ्यावी. या प्रतिक्रियेने अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने उलट भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर प्रश्‍न उपस्थित केले. सरकार समर्थक पक्ष भारतात मुस्लिम समुदायाविरोधात वातावरण तयार करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. मंदिर प्रकरणातील आरोपीविरोधात कारवाई करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे नमूद केले. भारताने आत्मपरिक्षण करावे असा अनाहूत सल्ला देत आपल्याकडे राहत असलेल्या अल्पसंख्याकांचे मूलभूत अधिकार, जीवनमान आणि प्रार्थनास्थळाची सुरक्षा पाहावी, असेही पाकिस्तानने म्हटले.

पाकिस्तानात २२ लाख हिंदू समुदाय

नॅशनल डेटाबेस ॲड रजिस्ट्रेशन अथोरिटीच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात अल्पसंख्याकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पाच टकक्यांपेक्षा कमी आहे. यात हिंदू हा सर्वात मोठा समूह आहे. मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्या १८,६८,९०,६०१ असून त्यात मुस्लिमांची संख्या १८,२५,९२,००० आणि हिंदूंची संख्या २२,१०,५६६ आहे. ख्रिश्‍चन १८,७३,३४८, अहमदिया १,८८,३४०, शिख ७४,१३०, बहाई १४,५३७ आणि पारशी ३९१७ अशी संख्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com