esakal | तालिबानच्या विजयानंतर भारतीय सीमेजवळील पाकच्या हालचाली वाढल्या
sakal

बोलून बातमी शोधा

LOC

तालिबानच्या विजयानंतर भारतीय सीमेजवळील पाकच्या हालचाली वाढल्या

sakal_logo
By
सुधीर काकडे

पाकिस्तानच्या एअऱ फोर्सने (Pakistan Air Force) भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ (LOC) असलेले दोन हवाई तळ पुन्हा सुरु केले आहे. सीमारेषेजवळ पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये (POK) असलेली कोटली आणि रावळकोट हे दोन्ही हवाई तळ श्रीनगरपासून फक्त १०० किमी अंतरावर आहेत. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे सीमारेषेवरील तणाव वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी एअर फोर्सने सुरु केलेले कोटली एअर बेस हे पाकिस्तानी लष्कराच्या डिव्हिजन २३ च्या पीओके ३ ब्रिगेडमध्ये आहे. १०० पेक्षा जास्त हवाई दलाचे ट्रूप्स या तळावर दाखल झाले आहेत. तर रावळकोट हवाई तळ हे डिव्हिजन १२ मधील पीओके २ परिसरात आहे. मागच्या ४ वर्षांपासून हे हवाई तळ बंद होते. त्यामुळे तालिबानच्या विजयानंतर पाकिस्तानच्या हालचाली वाढल्याचे दिसते आहे.

भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमुळेच पाकिस्तानी हवाईदलाने हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. त्यावेळी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान पाकिस्तानच्या बालाकोट भागात जाऊन परतले होते, मात्र पाकिस्तान एअर फोर्सला काहीच करता आले नव्हते. त्यामुळे आता एफ-१६ लढाऊ विमानांच्या मदतीने हा परिसर सुरक्षित करण्यासाठी कोटली आणि रावळकोट हवाई तळांना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला असल्याची शक्यता सुरक्षा तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?

पाकिस्तान एअर फोर्सने सिंध प्रांतातील लष्कराच्या ताब्यात असलेल्या ७००० एकर जागेवर लष्करी छावणी उभारण्याचे काम सुरु केले आहे. बलुचिस्तानमधील शामसी येथील हवाई तळार 403 स्कॉड्रन हेलिकॉप्टर पाठवले असून रडार यंत्रणेचे नेटवर्क तयार केले आहे. या सर्व हालचालींवरुन पाकिस्तान सध्या आपली लष्करी सज्जता वाढवत असल्याचे दिसते.

loading image
go to top