पाकची पुन्हा कुर'घोडी'; भारताचा 'आझाद काश्मीर'वर आक्षेप

वृत्तसंस्था
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पाकिस्तानी घोडेस्वाराचा घोडा स्पर्धेपूर्वीच का इतका चर्चेत आलाय? तर तो त्याचा नावामुळे फेमस झालाय...

इस्लामाबाद : टोकियो मध्ये या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही सुरू होण्याआधीच चर्चे आली आहे. ती कोणत्या खेळाडूमुळे नसून चक्क एक घोड्यामुळे! या घोड्याच्या नावाची इतकी चर्चा झालीय की त्या नावावर भारताने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी घोडेस्वाराचा घोडा स्पर्धेपूर्वीच का इतका चर्चेत आलाय? तर तो त्याचा नावामुळे फेमस झालाय...

साप डंख मारत असतानाही पत्रकार बोलतच राहिली...

टोकियोमधील ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानमधील उस्मान खान हा घोडेस्वार पात्र झालाय. त्याने आपल्या स्पर्धेतील घोड्याचे नाव 'आझाद काश्मीर' असे ठेवले आहे. घोड्याचे असे नाव ठेवल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.  या घोडेस्वाराच्या या वागणूकीवर संघटनेने आक्षेप घेतला आहे.  ऑलिम्पिक नियमावलीनुसार, ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय, धार्मिक कृत्य करण्याला मनाई आहे. त्यामुळे उस्मान खान या घोडस्वाराच्या या करामतीमुळे नियमांचा भंग झाल्याची तक्रार भारतीय ऑलिम्पिक संघटना करणार आहे. 

Image result for azad kashmir horse

उस्मान ऑलिम्पिकसाठी कसून सराव करत असून, त्याने 'आझाद काश्मीर' या त्याच्या घोड्यालाही चांगलेच तयार केले आहे. त्याने मगील वर्षी ऑस्ट्रेलियातून हा घोडा खरेदी केला होता. तर उस्मान स्वतः वयाच्या सातव्या वर्षापासून घोडेस्वारी शिकतोय. त्याचे वडिल पाकिस्तानी लष्करात होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for azad kashmir horse

भारताकडून घोडेस्वारीसाठी फवाद मिर्झा दाखल झाला असून, त्याचाही सराव कसून सुरू आहे. भारत पाकिस्तानमध्ये काश्मीर वाद धगधगचा असतानाचा हा प्रकार घडल्याने भारतीय संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघटना या प्रकाराबाबत तक्रार करता येते का याची चाचपणी करून लवकरच यावर कायदेशीर प्रक्रिया करेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan s Olympic horse rider gives Azad Kashmir name to his horse