पाकमध्ये हिंदू विवाह कायद्याला मंजुरी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पाकिस्तानमधील संसदीय समितीने एकमताने मंजूर केले होते. या कायद्यामुळे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू नागरिकांसाठी लवकरच नवा विवाह कायदा अस्तित्वात येईल.

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील हिंदू महिलांना दिलासा देणारा हिंदू विवाह कायद्याला आज
(शनिवार) वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली आहे.  संसदीय समितीने मंजुरी दिली आहे. 

सरकारच्या अनुत्साहामुळे अनेक दशकांपासून लांबणीवर पडलेले हिंदू विवाह विधेयक मंजूर झाले आहे. संसदीय समितीने मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबाजवणीसाठी वरिष्ठ सभागृहाची मंजुरी आवश्‍यक होती. आज ती मंजुरी मिळाल्याने हिंदू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाने चार महिन्यांपूर्वीच या कायद्याच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. या कायद्यामुळे हिंदूंच्या विवाहाची अधिकृत नोंदणी होणार असल्याने हिंदू महिलांना वाद निर्माण झाल्यास न्यायालयात दावा दाखल करता येणे शक्‍य आहे. यापूर्वी कायद्याअभावी हिंदू महिलांवर प्रचंड अन्याय होत होता.

पाकिस्तानमधील संसदीय समितीने एकमताने मंजूर केले होते. या कायद्यामुळे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू नागरिकांसाठी लवकरच नवा विवाह कायदा अस्तित्वात येईल. कायदा आणि न्याय विषयावरील स्थायी समितीने हिंदू विवाह विधेयक, 2015 चा मसुदा मंजूर केला होता.

Web Title: Pakistan Senate passes much-awaited landmark Hindu marriage bill