इफ्तार पार्टीवरून पाकिस्तानकडून धमकी

इफ्तार पार्टीवरून पाकिस्तानकडून धमकी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या इफ्तार पार्टीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी आलेल्या शेकडो पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रोखले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानने हे कृत्य केले. भारतीय दुतावासाकडून इफ्तार पार्टीसाठी शेकडो पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानी यंत्रणांनी गुप्त क्रमांकांवरून फोन केले आणि या सर्व पाहुण्यांना धमकावले. तसेच इफ्तार पार्टीला आल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी देण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी पाकिस्तानविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सर्व पाहुण्यांची माफीही मागितली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com