मोदींकडून ब्रिक्स देशांची दिशाभूल- अझीझ

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

इस्लामाबाद - दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स आणि बिम्सटेकमध्ये सहभागी असलेल्या देशांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी केली आहे.

इस्लामाबाद - दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स आणि बिम्सटेकमध्ये सहभागी असलेल्या देशांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी केली आहे.

गोव्यातील ब्रिक्स देशांच्या परिषदेत बोलताना मोदींनी दहशतवादामुळे दक्षिण आशिया, पश्‍चिम आशिया, मिडल ईस्ट, यूरोपला धोका निर्माण झाला असून, दुर्दैवाने आमचा शेजारी देश जगभरातील दहशतवादाची मातृभूमी आहे, असे म्हटले होते. पाकिस्तानवर निशाणा साधला. जगभरात दहशतवादाची जी पाळेमुळे रोवली आहेत, त्याचे मूळ आमच्या शेजारी राष्ट्राशी संबंधित आहे. हा देश दहशतवाद्यांचे फक्त आश्रयस्थान नसून, या देशाची मानसिकताही दहशतवादीच आहे, असा हल्लाबोल केला होता.

यावर बोलताना अझीझ म्हणाले, की मोदी ब्रिक्स आणि बिम्सटेकमधील सहभागी देशांची दिशाभूल करत आहेत. मोदींकडून होत असलेले आरोप चुकीचे आहेत. दहशतवादाविरोधातील लढाईत पाकिस्तानही सहभागी आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारत सरकारकडून होत असलेल्या कारवाया लपविण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत. काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलने करत असलेल्या नागरिकांना दहशतवाद्यांच्या श्रेणीत नाही ठेवले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्राकडून सतत सांगण्यात आले आहे. ब्रिक्स आणि बिम्सटेक देशांकडून दहशतवाद संपविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना पाकिस्तानचा पाठिंबा आहे.

Web Title: Pakistan tries to play down BRICS success