"पाकिस्तानने तुमच्यासाठी हजारो प्राणांची आहुती दिली...'

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पाकिस्तानचे सैन्य एक असामान्य युद्ध लढत आहे. यामध्ये होत असलेल्या हानीस अंतच नाही. अमेरिकेवर अंधपणे विश्‍वास ठेवू नका, असा धडाच आता इतिहासाने आम्हाला दिला आहे. ते आनंदी नाहीत, याचे आम्हाला दु:ख आहे. मात्र आम्ही आता आमची प्रतिष्ठा जपण्यार्थ तडजोडी करणार नाही

नवी दिल्ली - ""तुम्ही पाकिस्तानला विचारता की आम्ही काय केले आहे? पाकिस्तानच्या भूमीवरुन तुम्ही अफगाणिस्तानवर 57,800 हल्ले केले. तुम्ही सुरु केलेल्या युद्धामध्ये आमचे सहस्त्रावधी नागरिक व सैनिक मृत्युमुखी पडले,'' अशी संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानकडून सतत खोटारडेपणा व फसवणूक करण्यात येत असल्याची टीका करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी मदत बंद करण्याची घोषणा नुकतीच केली. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

"पाकिस्तानचे सैन्य एक असामान्य युद्ध लढत आहे. यामध्ये होत असलेल्या हानीस अंतच नाही. अमेरिकेवर अंधपणे विश्‍वास ठेवू नका, असा धडाच आता इतिहासाने आम्हाला दिला आहे. ते आनंदी नाहीत, याचे आम्हाला दु:ख आहे. मात्र आम्ही आता आमची प्रतिष्ठा जपण्यार्थ तडजोडी करणार नाही,'' असे आसिफ म्हणाले.
पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक

राजकारणात दूरगामी पडसाद उमटण्याची दाट शक्‍यता असल्याचे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan usa donald trump afghanistan