युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होईल: पाक

वृत्तसंस्था
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - पाकिस्तानशी युद्ध केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान होईल, याची जाणीव असल्याने भारत पाकिस्तानशी युद्ध करण्याचा धोका पत्करणार नाही, असे मत पाकिस्तानच्या एका उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. 
 
जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे दहशतवादी हल्ला घडविण्यात आल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील तणाव अत्यंत वाढला असून पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकटे पाडण्याचा यत्न भारताकडून केला जात असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानला एकटे पाडण्याची कल्पना ही प्रत्यक्षात उतरणे शक्‍य नसल्याचे मत व्यक्त करीत या अधिकाऱ्याने उलटपक्षी या यत्नामधून भारतच एकाकी पडण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. डॉन या प्रख्यात पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाले आहे.

""भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही. पाकिस्तानची युद्ध करण्याची कोणतीही इच्छा नाही; आणि यावेळी युद्ध झाल्यास भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होईल, याची जाणीव भारतासही आहेच,‘‘ असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

Web Title: Pakistan warns India about any action against terrorism