पाकमध्ये महिला लोकप्रतिनीधीची संसदेत छेडछाड

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

कराची (पाकिस्तान)- एकाने महिला प्रतिनिधीची संसदेतच छेडछाड केल्याची घटना घडली आहे. यामुळे संसदेमध्येही महिला सुरक्षित नसल्याची तक्रार महिलेनी केली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

नुसरत सहार अब्बासी यांनी एका सहकाऱयाने आपली छेडछाडीची केल्याचे म्हटले आहे. अब्बासी या सिंध प्रांताच्या खासदार आहेत. मंत्री इमदाद पिताफी यांनी संसदेतील त्यांच्या कार्यालयात आमंत्रित केले होते. त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी आपली छेडछाड केली, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

संसदेत महिला सुरक्षित नसतील तर देशातील महिलांची काय अवस्था असेल याबाबत विचार करायलाच नको. संसदेतील छेडछाडीचे प्रकरण संपले असले तरी महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आपण संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे अब्बासी यांनी म्हटले आहे.

Web Title: Pakistani female lawmaker harassed in parliament