पाकिस्तानी कार्यक्रमांवर सरसकट बंदी नाही

यूएनआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - पाकिस्तानने आजपासून सर्व भारतीय कार्यक्रमांचे प्रसारण करण्यावर सरसकट बंदी जारी केली असली, तरी भारत सरकार पाकिस्तानच्या कार्यक्रमांवर अशी बंदी घालणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज स्पष्ट केले.

भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानने भारतीय मालिका आणि चित्रपट प्रसारणावर निर्बंध आणले होते. आजपासून मात्र त्यांनी यावर पूर्ण बंदी घातली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांना विचारले असता ते म्हणाले, ""पाकिस्तानचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव असल्याचे यामुळे सिद्ध होत आहे. भारत मात्र पाकिस्तानच्या कार्यक्रमांवर अशी बंदी आणणार नाही. "जिंदगी'सारख्या वाहिन्यांवर तुम्ही पाकिस्तानी मालिका पाहू शकता.'' पाकिस्तानमध्ये भारतीय मालिका आणि चित्रपट लोकप्रिय असल्याने पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावर मनोरंजन कंपन्या आणि नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: pakistani overall programs is not a ban