भारतातील नव्हे, पाकिस्तानातील मंत्रीही करतात राहुल गांधींवर टीका

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीरसंबंधी एक याचिका दाखल केली असून यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. 'राहुल गांधी हे गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले पणजोबा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आदर्श घ्यावा.' राहुल यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य बनविले होते. त्यानंतर चौधरी यांनी असे म्हटले आहे.   

''तुमच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे जरा सत्यतेजवळ जाईल, अशी भूमिका घ्या. तुम्ही पणजोबांचा आदर्श घ्या, जे भारतीय धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादी विचारसरणीचे प्रतीक होते,'' असे चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीरसंबंधी एक याचिका दाखल केली असून यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतले आहे. यामुळे राहुल गांधी यांनी पाकिस्तानला जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून काश्मीरमध्ये जो हिंसाचार होत आहे, त्याला पाकिस्तान खत-पाणी घालत आहे, असे राहुल गांधींनी सुनावले होते. 

केंद्र सरकार आणि आमच्यात अनेक गोष्टींवरून मतभेद आहेत. मात्र, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशाने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani Politics Fawad Hussain comment on Congress leader Rahul Gandhi