
- उद्योग-धंदे बंद करणे संविधानाचे उल्लंघन
- प्रशासनाने सहकार्य करावे
इस्लामाबाद : जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध देशांकडून लॉकडाऊनसारख्या पर्यायाचा अवलंब करत कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु पाकिस्तानात एक वेगळाच प्रकार पाहिला मिळत आहे. या देशात मात्र सर्वोच्च न्यायालयाने बाजारपेठा उघडण्यास परवानगी दिली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पाकिस्तानात सध्या 42 हजारहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे त्या देशातही लॉकडाऊन सुरुच राहण्याबाबत विचार होणे अपेक्षित होते. तिथे मात्र खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच बाजारपेठा उघडण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे. त्यानुसार, आता शॉपिंग मॉल्स्, बाजारापेठा आठवड्याच्या सातही दिवस सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येथे काही दिवसांपासून बाजारपेठा बंद होत्या. पण न्यायालयाने याबाबत सांगितले, की बाजारपेठा सुरु केल्या नाहीत तर दुकानदार भूकेने मरतील. कोरोना व्हायरसचा संसर्ग हा काही एक-दोन दिवसांत संपणारा नाही. त्यामुळे आता तिथं दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणतात...
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गुलजार अहमद यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय पीठाने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अहमद यांनी सांगितले, की दुकानं बंद केली तर दुकानदार कोरोनाऐवजी भुकेने मरतील. त्यामुळे बाजारपेठा सुरु करावीत.
उद्योग-धंदे बंद करणे संविधानाचे उल्लंघन
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आठवड्याच्या शेवटी बाजारपेठा बंद ठेवण्यासाठी दाखल याचिका फेटाळून लावत सांगितले, की कोणत्याही विशेष दिवशी व्यवहार बंद ठेवणे हे एकप्रकारे संविधानाचे उल्लंघन आहे.
प्रशासनाने सहकार्य करावे
मुख्य न्यायमूर्ती अहमद यांनी सांगितले, की आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना परवानगी मिळाल्यानंतर शॉपिंग मॉल उघडण्यास कोणतीही अडचण निर्माण होईल, असे काम करू नये. न्यायालयाला आशा आहे, की आरोग्य मंत्रालय कोणतीही अडचण निर्माण न करता बाजारपेठा सुरु करण्याची परवानगी देईल.