हाफिज सईदसोबत पॅलेस्टाईनचे राजदूत; भारताकडून निषेध

वृत्तसंस्था
शनिवार, 30 डिसेंबर 2017

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे, की याबाबतचे वृत्त आम्ही पाहिले असून, याचा आम्ही निषेध करत आहोत. दिल्लीतील पॅलेस्टाईन राजदूत आणि अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.

इस्लामाबाद - लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्यासोबत एकाच मंचावर पॅलेस्टाईनचे राजदूत दिसल्याने भारताकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे, की याबाबतचे वृत्त आम्ही पाहिले असून, याचा आम्ही निषेध करत आहोत. दिल्लीतील पॅलेस्टाईन राजदूत आणि अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.

रावळपिंडी येथे हाफिज सईदच्या रॅलीत पॅलेस्टाईनचे राजदूत वलीद अबु अली हे सहभागी झाले होते. त्याच्यासोबत ते उपस्थित नागरिकांना संबोधित करताना दिसले. अबु अली दिफा-ए-पाकिस्तान या रॅलीतही सहभागी झाले होते. दिफा-ए-पाकिस्तान ही मुस्लिम संघटना असून, हाफिज सईदही यामध्ये सहभागी आहे. इस्त्राईलची राजधानी जेरुसलेमला हलविण्यात आल्याने मुस्लिम संघटनांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palestine Envoy Shares Stage With Hafiz Saeed In Pak India Says Will Take Up Strongly