कोरोनाचा शेवट होण्यापासून जग किती लांब? WHO प्रमुखांनी सांगितला उपाय

who chief
who chiefFile Photo

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट भारतासह जगभरात सुरु आहे. सध्या ही महासाथ पुरेशी आटोक्यात असून ती संपुष्टात आलेली नाहीये. मात्र, ही महासाथ कधी नष्ट होईल, असा प्रश्न अनेकांना पडतो तसेच याबाबत सतत विचारणा देखील होते. ही साथ संपुष्टात येण्यापासून आपण अजून किती लांब आहोत, किती काळ जाणार आहे, असे देखील प्रश्न सातत्याने चर्चेत आहेत. मात्र, याच प्रश्नाचं उत्तर आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिलंय. गेब्रेयसस यांनी म्हटलंय की, कोरोना व्हायरसच्या महासाथीचा शेवट होण्यापासून आपण अजून खूप लांब आहोत. सध्या जगाला सार्वजनिक आरोग्यासाठीचे उपाय प्रभावीपणे वापरणे गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

who chief
समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो आला समोर

या महासाथीचा तेंव्हाच शेवट होईल जेंव्हा जग ठरवेल की याचा शेवट करायचा आहे. हे तर आपल्याच हातात आहे. आपल्याकडे आवश्यक ती सगळी शस्त्रे आहेत. प्रभावी अशी सार्वजनिक आरोग्यासाठीचे उपाय शिवाय प्रभावी वैद्यकीय उपकरणे देखील आहेत. मात्र, जगाने हे शस्त्रे नीटपणे वापरलेलीच नाहीयेत. आठवड्याला जवळपास 50 हजार मृत्यूंच्या आकडेवारीसोबत या महासाथीचा शेवट होण्यापासून आपण खूपच लांब आहोत, असं मत WHOच्या प्रमुखांनी मांडलंय. ते बर्लिनमधील वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये काल रविवारी बोलत होते.

who chief
"मोदीजी, लसीकरणाचं झालं; आता पेट्रोलच्या शंभरीवर सेलिब्रेशन व्हावं"

WHO प्रमुखांनी जी 20 देशांना त्यांच्या 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याची विनंती केली आहे. त्यांनी कोव्हॅक्स यंत्रणा आणि आफ्रिकन लस अधिग्रहण ट्रस्ट (AVAT) मध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केलंय. WHOच्या वेबसाइटनुसार, कोरोनाच्या चाचण्या, उपचार आणि लसींमध्ये विकास, उत्पादन आणि न्याय्य प्रवेशाला गती देण्याचे Covax आणि ACT चे लक्ष्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com