विमानांत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर बंदी; अमेरिकेचे नवे नियम

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

पश्‍चिम आशियातील दहा देशांसाठी अमेरिकेचे नवे नियम

वॉशिंग्टन: काही जहालमतवादी लोक प्रवासी जेट विमाने उडविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली आहे. त्यामुळे पश्‍चिम आशियातील दहा देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार आठ देशांतील नऊ विमान कंपन्यांना यासाठी 96 तासांची मुदत देण्यात आली आहे. यानंतर केबिनमध्ये सेलफोन किंवा स्मार्टफोन नेण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लॅपटॉप, टॅबलेट आणि पोर्टेबल गेम डिव्हायसेसवरही बंदी असणार आहे. अशा डिव्हायसेसमध्ये छुपे बॉम्ब नेता येऊ शकत असल्याने यावर बंदी घातल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षितता विचारात घेऊनच हे निर्णय घेतल्याचेही या वेळी या अधिकाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, जॉर्डन, इस्तंबूल, सौदी अरेबिया, मोरोक्को, कतार, दुबई आदी देशांतील विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Passengers ban on electronic goods