भारतासोबत चर्चेने शांतता शक्य : पाक लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये काश्मीरसह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी व्यापक आणि अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. याबाबतची चर्चा कोणत्याही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने नसेल. पाकिस्तान अशा चर्चेसाठी वचनबद्ध आहे.

- जनरल कमर जावेद बाजवा, लष्करप्रमुख, पाकिस्तान

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाद हा व्यापक आणि महत्वपूर्ण चर्चेनंतरच सोडवता येऊ शकतो. यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हायला हवी. चर्चेनेच शांतता शक्य आहे, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सांगितले.

Bajwa kamar

काबुल येथे पाकिस्तान मिलिटरी अॅकॅडमीच्या 'पासिंग आऊट परेड ऑफ कॅडेटस्'मध्ये बाजवा बोलत होते. ते म्हणाले, आम्हाला विश्वास आहे, की पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये काश्मीरसह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी व्यापक आणि अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. याबाबतची चर्चा कोणत्याही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने नसेल. पाकिस्तान अशा चर्चेसाठी वचनबद्ध आहे. मात्र, ही चर्चा पूर्ण समानता, आदर आणि सन्मानाने होणे गरजेचे आहे, असे बाजवा म्हणाले. 

पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून, देशातील सर्व विशेषत: शेजारील देशासोबत सामंजस्यपूर्ण आणि शांततापूर्ण अस्तित्वाची अपेक्षा करत आहे. तसेच आमचे सैन्य कोणतेही आव्हान पेलण्यास आणि त्यांना सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Peace with India possible only through dialogue says Pakistan Army chief Gen Qamar Javed Bajwa