esakal | जपानचे पंतप्रधान म्हणून यांना जनतेतून पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

shigeru ishiba

जपानचे पंतप्रधान म्हणून माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशीबा यांना जनतेतून पसंती असल्याचे वृत्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंजो ॲबे यांनी हे पद सोडले आहे.

जपानचे पंतप्रधान म्हणून यांना जनतेतून पसंती

sakal_logo
By
यूएनआय

टोकियो - जपानचे पंतप्रधान म्हणून माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशीबा यांना जनतेतून पसंती असल्याचे वृत्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंजो ॲबे यांनी हे पद सोडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रसार माध्यमांच्या सर्वेक्षणात त्यांना पसंती मिळाली. विशेष म्हणजे इशीबा हे ॲबे यांचे टीकाकार मानले जातात. ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्यासमोर मंत्रीमंडळाचे मुख्य चिटणीस योशिहिदे सुगा यांचे आव्हान असेल. सुगा यांनी देशाचे नेतृत्व करण्यात रस असल्याचे रविवारीच जाहीर केले आहे. पक्षातील प्रमुख गटांचा त्यांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

जपानमध्ये नेत्याची थेट मतदानाद्वारे निवड होत नाही. संसदेच्या राजकीय पद्धतीनुसार खासदार पंतप्रधानांची निवड करतात, जो सहसा सत्ताधारी पक्षाचा नेता असतो. सुगा यांना पक्षाचे सरचिटणीस तोशिहीरो निकाई यांची पसंती असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

Edited By - Prashant Patil