भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

भुट्टो यांची 2007 मध्ये रावळपिंडी येथे गोळ्या झाडून आणि बॉंब स्फोट घडवून हत्या झाली होती. गेली दहा वर्षे या खटल्यावर सुनावणी सुरू होती. अखेर आज न्यायालयाने निकाल देत दोन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेले माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना आज (गुरुवार) येथील विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने फरारी घोषित केले. तसेच या प्रकरणी दोन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना 17 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

भुट्टो यांची 2007 मध्ये रावळपिंडी येथे गोळ्या झाडून आणि बॉंब स्फोट घडवून हत्या झाली होती. गेली दहा वर्षे या खटल्यावर सुनावणी सुरू होती. अखेर आज न्यायालयाने निकाल देत दोन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला. मुशर्रफ यांना फरारी घोषित करतानाच त्यांची संपत्ती गोठविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Web Title: Pervez Musharraf declared fugitive in ex-Pakistan PM Benazir Bhutto's murder trial