पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांचे दिल्लीशी आहे वेगळे नाते!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

- पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे दिल्लीशी आहे एक विशेष नातेसंबंध.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे दिल्लीशी एक विशेष नातेसंबंध आहे. परवेज मुशर्रफ यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे बालपणही दिल्लीतच गेले. त्यानंतर मुशर्रफ यांनी अनेक वर्षे अमेरिकेत घालवली. मात्र, काही काळ ते दुबईतही होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांचे दिल्लीशी असलेले नाते आता समोर येत आहे. परवेज मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट, 1943 मध्ये दिल्लीतील दरियागंज येथे झाला. भारताच्या विभाजनानंतर त्यांचे कुटुंबीय कराची येथे वास्तव्यास गेले. त्यानंतरच्या काही काळानंतर ते थेट पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख बनले. त्यांनी 1999 मध्ये नवाज शरीफ यांच्या लोकतांत्रिक सरकारचा राजकारणच पलटून टाकले. त्यांनी 20 जून, 2001 ते 18 ऑगस्ट 2008 या कालावधीत पाकिस्तानचे राष्ट्रपतिपद भूषविले. 

Image may contain: plant and outdoor

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

जुन्या दिल्लीत त्यांचा जन्म झाला. ज्या घरात त्यांचा जन्म झाला ते घर आता खूप जुने झाले आहे. आता ते घर मोडकळीसही आले आहे. पण तरीही सध्या त्या हवेलीत 8 कुटुंब राहत आहे. मुशर्रफ यांचे जिथं बालपण गेले तिथं 2001 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान घरी गेले होते.

विभाजनानंतर पाकिस्तानात जाण्याचा निर्णय

विभाजनानंतर मुशर्रफ यांच्या परिवाराने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी जुन्या दिल्लीतील त्यांचे निवासस्थान सोडले. जेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला तेव्हा परवेज हे अवघ्या 4 वर्षांचे होते.

नेहरु कुटुंबियावर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला जामीन मंजूर

खरे मालक कोण निश्चिती नाही

सध्या त्यांच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही माहिती नाही, की त्यांच्या घराचे खरे मालक कोण आहेत. घराच्या कागदपत्रांवर सर्व माहिती उर्दूमध्ये लिहिली आहे. त्यामध्ये मुशर्रफ यांच्या वडिलांची इंग्रजीत सही आहे. अलिगड मुस्लिम विश्वविद्यायलाचे संस्थापक आणि अल्पसंख्यांक समाजाचे नेते सर सय्यद मुशर्रफ यांच्या शेजारील घरात ते राहत होते. 

आणखी वाचा : मैत्रिणीच्या किंकाळीने झाला मैत्रीचा शेवट

1999 मध्ये प्रकाशझोतात

एप्रिल ते जून 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगील युद्धादरम्यान परवेज मुशर्रफ प्रकाशझोतात आले. तेव्हा ते पाकिस्तानी सैन्याचे लष्करप्रमुख होते. जेव्हा ते लष्करप्रमुख होते तेव्हा त्यांनी भारताविरोधात अनेक कारवाया केल्या होत्या. 

Image may contain: 1 person, sitting

वाजपेयी यांच्याकडून सलोख्याचा प्रयत्न

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारत नवे नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न जास्त काळ यशस्वी होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pervez musharraf was born in Delhi