PFI Row: पाकिस्तानला PFIचा पुळका; मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याचा डाव

केंद्र सरकारने या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घातली आहे.
PFI
PFISakal

इस्लामाबाद : भारतातील राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकले आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे झाल्याने केंद्र सरकारने या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घातली आहे. तर यानंतर आता या संस्थेचा पाकिस्तानला पुळका आल्याचं समोर आलं आहे.

(PFI And Pakistan Latest Updates)

भारताने PFI या संघटनेवर बंदी घातल्यामुळे पाकिस्तानने याला विरोध केला आहे तर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याचा त्यांचा डाव असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती PFI ने आपल्या ट्वीटरवरून दिली होती. त्यानंतर हे ट्वीट पाकिस्तानच्या कॉन्सुलेट जनरलने संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत ट्वीटरला टॅग करून रिट्वीट केले आहे.

PFI
Pune Accident: हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी

त्यामुळे PFIचा पाकिस्तानला एवढा पुळका का येतो असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्याकडून हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याचा डाव आहे. तर आता ट्वीटर अकाऊंटवरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या बंदीनंतर एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तर आरएसएसवरही बंदी घाला अशी मागणी काँग्रेसकडून आणि अनेक नेत्यांकडून करण्यात आली आहे.

काय आहे PFIचे प्रकरण?

टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायांच्या संशयातून NIAने PFIच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतरच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट असून भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय त्यांच्या टार्गेटवर असल्याचं तपासून समोर आलं आहे. त्याचबरोबर मुस्लीम तरूणांची माते भडकावण्याचे काम या संस्थेकडून होत असल्याची माहिती संबंधित आरोपींनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com