corona: 2020 मध्येच लस तयार करु; Pfizer कंपनीचा दावा

corona.jpg
corona.jpg

न्यूयॉर्क- जगभरात कोरोना महामारीचा कहर सुरु आहे. अशात कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस निर्माण करण्यासाठी अनेक देश युद्ध पातळीवर काम करत आहेत. अनेक कोविड लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत, तर 10 पेक्षा अधिक लशींचा चाचणीचा तिसरा टप्पा सुरु आहे. कोरोनावरील लस 2021 च्या सुरुवातीला उपलब्ध होईल, असं सांगण्यात येत आहे. पण फाइझर (Pfizer) कंपनीने 2020 मध्येच कोरोनावरील लस उपलब्ध करुन देण्याचा दावा केला आहे. 

अमेरिकेतील फाइझर कंपनी लस निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 2020 मध्येच कोरोना लस निर्माण होण्याची आशा व्यक्त केली आहे. फाइझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला (Albert Bourla) म्हणालेत की, चाचणीची प्रक्रिया जर अपेक्षेप्रमाणे झाली आणि नियामक मंडळाने याला मंजुरी दिली तर 2020 मध्ये लस उपलब्ध होईल. तसेच अमेरिकेमध्ये 4 कोटी लशीचीं मागणी पूर्ण केली जाऊ शकते. 

पाच नोव्हेंबरला देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन

सर्वकाही सुरळीत झालं तर आम्ही काही काळातच लशीचे वितरण सुरु करु शकतो, असंही बोर्ला म्हणाले आहेत. पण, त्यांनी स्पष्ट केलं की कोरोना लशीच्या प्रभावीपणाबाबत कंपनी अजूनही प्रमुख बेंचमार्कपर्यंत पोहोचलेली नाही. फाइझरने यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत लशीसंबंधीचा सर्व डेटा मिळण्याचा दावा केला होता. फाइझरने अमेरिकी सरकारशी करार केला असून 2020 मध्ये 4 कोटी तर 2021 मध्ये 10 कोटी लशींचे डोस देण्याचे मान्य केले आहे. 

बोर्ला यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कोविड-19 लस आपातकालीन वापरासाठी तयार होऊ शकते. लस निर्मितीसाठी आम्ही घाईमध्ये नाही. लशीवरील सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडत आहेत. लस चांगल्या पद्धतीने काम करेल. आम्ही सतर्क असून आशावादी आहोत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनुसार 150 पेक्षा अधिक उमेदवार कोरोना लस निर्मितीच्या कामात गुंतले आहे. अमेरिकेत जॉन्सन आणि जॉन्सन आणि मॉडर्ना कंपनीची कोविड लस काही महिन्यांमध्ये उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com