महिलांनी सांगितले तर पद सोडेन ; 'किस' घेणाऱ्या राष्ट्रपतींचे वक्तव्य

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

जर महिलांना चुंबन घेणे हे आक्षेपार्ह वाटत असेल तर आपल्या हस्ताक्षरात त्यांनी दुतर्ते यांना पदावरून दूर करण्यासाठी याचिका दाखल करावी. 

मनिला : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांनी येथील एका महिलेच्या ओठांचे चुंबन घेतले. दुतेर्ते यांच्या या विचित्र अशा प्रकारामुळे येथील जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली. त्यावर राष्ट्रपती दुतर्ते यांनी सांगितले, की जर महिलांनी सांगितले तर मी माझे राष्ट्रपतिपद सोडण्यास तयार आहे. 

राष्ट्रपती दुतर्ते यांनी एका महिलेचे सार्वजनिकरित्या ओठांचे चुंबन घेतले होते. त्यानंतर दुतर्ते चांगलेच चर्चेत आले. तसेच त्यानंतर काही लोकांकडून त्यांच्यावर टीकाही केली जात होती. त्यांच्यावर टीका होत असताना दुतर्ते यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, जर महिलांना चुंबन घेणे हे आक्षेपार्ह वाटत असेल तर आपल्या हस्ताक्षरात त्यांनी दुतर्ते यांना पदावरून दूर करण्यासाठी याचिका दाखल करावी. मात्र, दुतर्ते यांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे मनोरंजनसाठी असल्याचे सांगितले. मात्र, काही फेमिनिस्ट कम्युनिस्ट संघटनांकडून ही एक अश्लिल बाब असल्याचे सांगितले. 

Web Title: philippines president said that he is ready to resign