इम्रान खान यांना ठार मारण्याची योजना; दहशतवादविरोधी विभागाने दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plan to assassinate Imran Khan in Pakistan

इम्रान खान यांना ठार मारण्याची योजना; दहशतवादविरोधी विभागाने दिला इशारा

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या हत्येचा कट दहशतवाद्यांनी (Terrorists) रचला आहे. यासाठी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील मारेकऱ्याची मदत मागितली आहे. दहशतवादविरोधी विभागाने इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी सर्व शक्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, वृत्त ‘जंग’ या पाकिस्तानी वृत्तपत्रातील वृत्तात म्हटले आहे. (Plan to assassinate Imran Khan in Pakistan)

दहशतवादविरोधी विभागाने १८ जून रोजी अलर्ट जारी केला होता. धमकी गुप्त ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर लीक होण्यापासून रोखण्याचे आदेशही दिले होते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देत वृत्तपत्राने वृत्त दिले. पाकिस्तान (Pakistan) तेहरीक-ए-इन्साफच्या नेत्यांनी अलीकडच्या काही दिवसांत इम्रान खान (Imran Khan) यांना असलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा: भाजपच्या डावात फसले अरविंद केजरीवाल? मुर्मूपासून पाठ फिरवणे का अवघड!

माझ्याकडे अशी माहिती आहे की अफगाणिस्तानमधील कोची नावाच्या दहशतवाद्याला (Terrorists) इम्रान खान यांना मारण्याचा आदेश काही लोकांनी दिला आहे, असे पीटीआय नेते फयाज चौहान यांनी म्हटले आहे. आपल्या जिवाला धोका असल्याचे इम्रान खान यांनी मे महिन्यात म्हटले होते. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सुरक्षा यंत्रणांना इम्रान खान (Imran Khan) यांना शक्य ती सर्व सुरक्षा गृहमंत्रालयाला देण्याचे निर्देश दिले होते.

अमेरिकेवर केला होता आरोप

विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर इम्रान खान अडीच महिन्यांपासून सत्तेबाहेर आहेत. सत्तेत असताना त्यांनी अमेरिका सरकारला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, वॉशिंग्टनने या आरोपाला निरर्थक म्हटले होते.

Web Title: Plan To Assassinate Imran Khan In Pakistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top