ब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणारे विमान कोसळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

ब्राझील सिरीया ए संघातील फुटबॉलपटू विमानातून प्रवास करत होते. बुधवारी यांचा सामना मेडेलिन येथील ऍटलिटिको स्टेडियमवर कोपा सुदामेरिका संघाशी होणार होता.

रिओ दी जानिरो - ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉलपटूंना घेऊन जाणारे विमान कोलंबियामध्ये कोसळले. विमानातून 72 जण प्रवास करत होते.

मेडेलिन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान बोलिव्हिया येथे जात होते. ब्राझील सिरीया ए संघातील फुटबॉलपटू विमानातून प्रवास करत होते. बुधवारी यांचा सामना मेडेलिन येथील ऍटलिटिको स्टेडियमवर कोपा सुदामेरिका संघाशी होणार होता. या विमानातून एकूण 72 प्रवासी प्रवास करत होते.

विमानाच्या दुर्घटनेच्या ठिकाणी बचावपथक रवाना झाले असून, कोलंबियात ते कोसळले आहे. विमान दुर्घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक वेळेनुसार सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

Web Title: Plane carrying football players from Brazil crashes in Colombia