प्लाझ्माच्या साह्याने ३० सेकंदात विषाणू नष्ट; अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plasma

अरगॉनमिश्रित प्लाझ्माचा स्प्रेच्या वापराने या सर्व पृष्ठभागांवरील विषाणू एका मिनीटाच्या आत नष्ट झाले. मास्कमधील कापसावरील विषाणूही ३० सेकंदातच नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे. 

प्लाझ्माच्या साह्याने ३० सेकंदात विषाणू नष्ट; अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा

लॉस एंजेलिस - धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर असलेला कोरोना विषाणू प्लाझ्माच्या साह्याने ३० सेकंदात नष्ट होतो, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. या नव्या संशोधनाचा कोरोनाविरोधातील लढाईत उपयोग होऊ शकतो, असा तज्ज्ञांना विश्‍वास आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्लाझ्मा ही पदार्थाची एक अवस्था असून स्थिर वायू तापविल्याने किंवा शक्तीशाली विद्युत-चुंबकीय क्षेत्र निर्माण केल्याने ती निर्माण करता येते. अरगॉन या रासायनिक घटकाचा आणि वातावरणातील शीत प्लाझ्माचा वापर करून प्रक्रिया केल्यास धातू, चामडे आणि प्लास्टिक अशा पृष्ठभागांवरील कोरोना विषाणून ३० सेकंदात नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘फिजिक्स ऑफ फ्लुईड’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी ३-डी प्रिंटरच्या साह्याने वातावरणीय दाबाखालील प्लाझ्मा जेटचा वापर कोरोना विषाणू असलेल्या पृष्ठभागांवर केला. त्यांनी प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड, बास्केटबॉल, फुटबॉल आणि बेसबॉल यांच्या पृष्ठभागांवर हा प्रयोग केला. अरगॉनमिश्रित प्लाझ्माचा स्प्रेच्या वापराने या सर्व पृष्ठभागांवरील विषाणू एका मिनीटाच्या आत नष्ट झाले. बहुतांशी विषाणू ३० सेकंदातच नष्ट झाल्याचे निरीक्षण आहे. मास्कमधील कापसावरील विषाणूही ३० सेकंदातच नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणू विविध पृष्ठभागांवर काही तासांपर्यंत टिकून राहतो, असा निष्कर्ष आहे. त्यामुळे नव्या संशोधनाचा वापर करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होऊ शकते, असा विश्‍वास रिचर्ड ई. विर्झ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने व्यक्त केला. प्लाझ्माचा वापर करण्याची ही केवळ सुरुवात आहे. भविष्यातील अनेक संशोधनांमध्ये प्लाझ्माचा वापर शक्य असून अनेक समस्यांची उत्तरे यातून मिळतील, असे विर्झ  यांनी सांगितले. 

loading image
go to top