खेळाडूने सेक्स करताना चुकून दाबलं 'लाईव्ह' बटण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

एका खेळाडूने सेक्स करताना मोबाईलवर चुकून लाईव्हचे बटन दाबल्यामुळे ते क्षण लाईव्ह झाल्याचा प्रकार घडला आहे.

कॅमेरून: मोबाईल ही काळाजी गरज बनली असून, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसत आहे. पण, मोबाईलचा किती अन् कसा व कोणत्यावेळी वापर करावा, याचे भान असायला हवे. एका खेळाडूने सेक्स करताना मोबाईलवर चुकून लाईव्हचे बटन दाबल्यामुळे ते क्षण लाईव्ह झाल्याचा प्रकार घडला आहे.

कॅमेरूनचा फुटबॉलपटू क्लिंटन एन जी (Clinton N’Jie) याच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ लाईव्ह झाल्यामुळे सोशल मीडियावर तो चर्चेत आला आहे. रशियन प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी क्लिंटन एन जी हा डायनामो मॉस्को संघाशी चार वर्षांसाठी करारबद्ध झाला. तो आधी फ्रेंचच्या ऑलिम्पिक मर्सिल (Olympique Marseille) या संघाकडून खेळत होता. पण त्याने या संघाला सोडचिठ्ठी दिली आणि डायनामो मॉस्को संघाकडून नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्याला मोठा आनंद झाला होता.

क्लिंटन एन जी घरी आला तेंव्हा आनंदात होता. घरामध्ये सेक्स करत असतानाही त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. मोबाईलवर तो कराराच्या बातम्या वाचत होता. गुगलच्या जागी चुकून स्नॅपचॅट या सोशल अॅपचे लाईव्ह फिचर असलेले बटन दाबले आणि सेक्स करताना ते क्षण स्नॅपचॅटवर लाईव्ह झाले अन् अनेकांनी ते पाहिले. काही वेळामध्ये ही चूक लक्षात आल्यानंतर त्याने लाईव्ह बंद केले. पण, दरम्यानच्या काळात तो एकदम चर्चेत आला.

क्लिंटन एन जी म्हणाला, 'डायनामो मॉस्को संघाशी चार वर्षांसाठी करार केल्यामुळे मी खूप आनंदात होतो. आनंद साजरा करत असताना मद्यपान केले होते. शिवाय, सेक्स करत असताना मोबाईल हातामध्येच होता. अतिमद्यपानामुळे मी मोबाईलवर चुकून बटन दाबले. घडलेल्या या प्रकरणाबद्दल संघाची आणि चाहत्यांची माफी मागतो.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Player Clinton NJie accidentally live streams sex video