पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्य कमला हॅरिस यांची भेट घेतली.
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्य कमला हॅरिस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेकडून कोरोनाच्या संकटात मिळालेल्या सहकार्याबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. व्हाइट हाऊसमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर प्रतिनिधींसोबत बैठकही झाली.
पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तसंच या चर्चेवेळी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, पाकमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यांच्याविरोधात पाकने कारवाई करावी. त्यांच्यामुळे अमेरिका किंवा भारताच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होऊ नये.
पतंप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले. भारत आणि अमेरिकेचे सहकार्य हळू हळू वाढत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यावेळी एक ऐतिहासिक घटना ठरली. जगभरातील लोकांसाथी तुम्ही एख प्रेरणा आहात आणि मला विश्वास आहे की, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्वात आपले द्विपक्षीय संबंध मोठी उंची गाठतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.