वर्णभेदाविरोधात लढणारे कार्यकर्ते डेसमंड टूटू यांंचं निधन; पंतप्रधानांकडून शोक

वर्णभेदाविरोधात लढणारे कार्यकर्ते डेसमंड टूटू यांंचं निधन; पंतप्रधानांकडून शोक

नवी दिल्ली : शांतीचा नोबेल पुरस्कार जिंकणारे (Nobel Peace Prize-winning activist) दक्षिण अफ्रिकेचे आर्चबिशप राहिलेल्या डेसमंड टूटू (Archbishop Desmond Tutu's Death) यांचं आज रविवारी निधन झालं. त्यांचं वय 90 वर्षे होतं. दक्षिण अफ्रीकेतील वर्णभेदविरोधी लढ्याचं प्रतिक म्हणून ते ओळखले जायचे. टूटू यांच्या निधनानंतर दक्षिण अफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी दु:ख व्यक्त केलंय. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देखील त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

वर्णभेदाविरोधात लढणारे कार्यकर्ते डेसमंड टूटू यांंचं निधन; पंतप्रधानांकडून शोक
मुलांना कोणती लस देणार? नोंदणी कशी होईल? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा (South African President Cyril Ramaphosa) यांनी रविवारी टूटू यांच्या निधनाची माहिती देत म्हटलं की, आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टूटू यांचं निधनामुळे वर्णभेदी लढ्याविरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डेसमंड टूटू यांना भारतातील गांधी शांती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

वर्णभेदाविरोधात लढणारे कार्यकर्ते डेसमंड टूटू यांंचं निधन; पंतप्रधानांकडून शोक
जेम्स लेन प्रकरणावरून हल्ला झालेल्या भांडारकर संस्थेचं मोदींकडून कौतुक

वर्णभेदाचा विरोध आणि समान अधिकारांसाठी चळवळ

1984 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल प्राप्त झाला होता. दोन वर्षांनंतर 1986 मध्ये ते केपटाऊनमध्ये पहिले आर्चबिशप बनवले गेले. अफ्रीकन नॅशनल काँग्रेससोबत बातचित केल्यानंतर 1990 मध्ये नेल्सन मंडेलांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं आणि वर्णभेदाचा कायदा नष्ट करण्यात आला. 2007 मध्ये टूटू यांना भारताकडून गांधी शांती पुरस्कार देण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू हे जगभरातील असंख्य लोकांसाठी मार्गदर्शन करणारा प्रकाश होते. मानवी सन्मान आणि समानतेवर त्यांनी दिलेला भर कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झालं असून त्यांच्या सर्व चाहत्यांसाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असं मोदींनी ट्विट करत म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com