PM Modi: पाकिस्तानातील पुर परिस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं मत म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi: पाकिस्तानातील पुर परिस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं मत म्हणाले...

PM Modi: पाकिस्तानातील पुर परिस्थितीवर मोदींनी व्यक्त केलं मत म्हणाले...

पाकिस्तानमध्ये महापुराचा हाहाकार चालू आहे. पाकिस्तानला आर्थिक परिस्थिती सोबत इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळं महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, या घटनांमुळे पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या पुरामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत लहान मुलांसह 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानातील पुरामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करून दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही त्यावर ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले आहे. ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून खूप दु:ख झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या तसेच पुरामुळे बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि परिस्थिती लवकर पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त करतो.”

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

त्यावर उत्तर देत पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानात पुरामुळे झालेल्या जीवित आणि साधनसंपत्तीच्या नुकसानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत धीर दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या विशिष्ट गुणांमुळे पाकिस्तानी जनता या संकटातून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा जनजीवन व्यवस्थित होईल अशी आशा आहे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

Web Title: Pm Modi Prime Minister Expressed Grief Over The Dire Flood Situation In Pakistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..