esakal | आदर पुनावाला लशीबाबत काय म्हणाले? वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

esakal.jpg

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

आदर पुनावाला लशीबाबत काय म्हणाले? वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेला संबोधित केले. भारताला संयुक्त राष्ट्रांवर प्रचंड विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत.  कृष्ण जन्मभूमी परिसरातील जमीन प्रकरणी मथुरा न्यायालयात एक सिव्हिल खटला दाखल करण्यात आला आहे. आदर पुनावाला यांनी नुकतच एक ट्विट केलं असून, त्यात त्यांनी भारतातील एकूण लसीकरणासाठी 80 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं म्हटलंय. जॉनसन अँड जॉनसन लशीच्या चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी दिली आहे. 

संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणेची गरज; पंतप्रधान मोदींची आमसभेत स्पष्टोक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेला संबोधित केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी संबोधन केले. भारताला संयुक्त राष्ट्रांवर प्रचंड विश्वास आहे. भारता इतका विश्वास क्वचितच कोणी टाकला असले, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांसाठी आग्रही असल्याचंही मोदींनी म्हटलंय. वाचा सविस्तर- 

रामलल्लानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात; मशिद हटवण्याची मागणी 

अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण सुरु झाले असताना आता मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचा मुद्दाही वेग घेण्याची शक्यता आहे. कृष्ण जन्मभूमी परिसरातील जमीन प्रकरणी मथुरा न्यायालयात एक सिव्हिल खटला दाखल करण्यात आला आहे. यात 13.37 एकर जमिनीवर दावा करण्यात आला असून यावर स्वामित्व मागण्यात आले आहे. शिवाय याठिकाणी असणाऱ्या ईदगाह मशिदीला हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर- 

कोरोना लस : 80 हजार कोटी उपलब्ध होतील का? आदर पुनावालांचा प्रश्न

आदर पुनावाला यांनी नुकतच एक ट्विट केलं असून, त्यात त्यांनी भारतातील एकूण लसीकरणासाठी 80 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं म्हटलंय. पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडे पुढील वर्षभरासाठी 80 हजार कोटी रुपये आहेत का? कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहचवण्यासाठी इतके पैसे लागणार आहेत. वाचा सविस्तर- 


एका संशोधनानुसार अधिक घातक असू शकतं दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह येणं 

जगभरात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येईल या शक्यतेवर चर्चा रंगली आहे. तसंच एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर तो दुसऱ्यांदाही होण्याबाबत अनेक माहिती समोर येत आहेत. आतापर्यंतच्या अभ्यासाअंती असा दावा केला गेला आहे की, दुसऱ्यांदा कोरोनाचे संक्रमण होणे, हे पहिल्यावेळेपेक्षा अधिक घातक असू शकते. वाचा सविस्तर-

चीनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार; 16 हजार इस्लामिक मशिदी पाडल्या

चीन शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लीमांवर अत्याचार करत असल्याच्या माहिती जगासमोर आली आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, चीनची कम्युनिस्ट पार्टी उइगर मुस्लिमांची संस्कृती आणि त्यांचा इतिहास नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलत आहे. शिनजियांग डेटा प्रॉजेक्टमध्ये चीनचा चेहरा उघडा पडला आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, शिनजियांग प्रांतातील 16 हजार मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्यात किंवा त्यांचे घुमट पाडण्यात आले आहेत. वाचा सविस्तर-

खुशखबर :जॉनसन लस देतीय 'कोरोना'विरोधात सकारात्मक परिणाम

जॉनसन अँड जॉनसन लशीच्या चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी दिली आहे. या लशीमुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी लागणारी प्रतिकार शक्ती चांगलीच वाढत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. वाचा सविस्तर-

कोविड लस येईपर्यंत किती लोकांचा बळी जाईल? WHOने सांगितला भीतीदायक आकडा 

कोरोना व्हायरसची भीती सर्व जगभरात असून बाधित आणि मृतांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा २० लाखांपर्यंत पोचू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनावर प्रभावी लस येण्यापूर्वी आणि व्यापक पातळीवर लोकांना लस देण्याआधी या साथीत बळी पडलेल्यांची संख्या २० लाखांपर्यंत पोचण्याची भीती व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर-