पाकसोबत मोदींना शांतता नको आहे - मुशर्रफ

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

पाकिस्तानमधील नागरिक धार्मिक आहेत, पण त्यांनी कधी धर्मांध पक्षाला निवडून दिले नाही. सध्या भारतात सत्तेत कट्टर धर्मांध पक्ष आहे. दिल्लीतील सत्ता तो पक्ष चालवत आहे.

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यात रस नाही. त्यांना पाकसोबत शांतता नकोच आहे, असे मत पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे.

येल विद्यापीठात पत्रकारांशी बोलताना मुशर्रफ म्हणाले, की पाकिस्तानमधील नागरिक धार्मिक आहेत, पण त्यांनी कधी धर्मांध पक्षाला निवडून दिले नाही. सध्या भारतात सत्तेत कट्टर धर्मांध पक्ष आहे. दिल्लीतील सत्ता तो पक्ष चालवत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींना पाकसोबत संबंध सुधारण्यात काही रस नाही.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरविषयी बोलताना मुशर्रफ म्हणाले, भारत आणि अमेरिकेतील संबंधांविषयी इस्लामाबादमधील सत्तेला काही अडचण नसेल. मग पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या संबंधांबाबत वॉशिंग्टनला काही अडचण असण्याचा प्रश्नच नाही. तालिबान आणि अल्-कायदाच्या दहशतवाद्यांविरोधात आम्ही लढत आहोत.

Web Title: PM Narendra Modi does not want peace with Pakistan: Pervez Musharraf