PM Modi in G-20 : "भारतातल्या विविध राज्यांमध्ये G-20 परिषदेच्या बैठका होतील"; पंतप्रधानांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi
PM Modi in G-20 : "भारतातल्या विविध राज्यांमध्ये G-20 परिषदेच्या बैठका होतील"; पंतप्रधानांची घोषणा

PM Modi in G-20 : "भारतातल्या विविध राज्यांमध्ये G-20 परिषदेच्या बैठका होतील"; पंतप्रधानांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-२० परिषदेसाठी बालीला गेले आहेत. भारत यंदा जी-२० परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी जी-२० परिषदेची भारताच्या अध्यक्षतेखालील भूमिका स्पष्ट केली आहे, तसंच महिला केंद्रीत विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. (PM Narendra Modi in G-20 Conclave)

हेही वाचा: G-20 शिखर परिषद : इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "वैश्विक विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे जी-२० अजेंडामध्ये आपण महिला केंद्रीत विकासावर भर द्यायला हवा. यासोबतच शांतता आणि सुरक्षाही प्रदान करायला हवी. कारण त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञानाचे फायदे घेता येणार नाही. यासाठी जी-२० मध्ये काम करायला हवं."

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर ही तत्वाने भारत काम करत आहे आणि करेल. जी-२० परिषदेचं अध्यक्षपद भूषवणं हे भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी हा विश्वास देतो की भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जी-२० ची बैठक होईल. जेणेकरून सर्व देशांना भारतातल्या विविधतेची ओळख होईल आणि सगळ्यांनाच लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या भारताला समजून घेता येईल."