अमेरिकेत अधिकारी हातात हात देत असताना मोदी झुकले, का?

वृत्तसंस्था
Sunday, 22 September 2019

मोदींच्या स्वागतावेळी देण्यात आलेल्या पुष्पगुच्छातील एक फूल खाली पडल्यानंतर मोदींनी तत्परता दाखवत लगेच ते फूल उचलून सुरक्षा रक्षकाकडे दिले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मोदींच्या या कृतीचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. तर, अमेरिकेच्या अध्यक्षांनाही त्यांचे स्वच्छतेबाबतचे प्रेम दिसून आले.

ह्यूस्टन : स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवून भारतात सर्वांची मने जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेबाबत प्रेम अमेरिका दौऱ्यातही दिसून आले.

मोदींच्या स्वागतावेळी देण्यात आलेल्या पुष्पगुच्छातील एक फूल खाली पडल्यानंतर मोदींनी तत्परता दाखवत लगेच ते फूल उचलून सुरक्षा रक्षकाकडे दिले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मोदींच्या या कृतीचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. तर, अमेरिकेच्या अध्यक्षांनाही त्यांचे स्वच्छतेबाबतचे प्रेम दिसून आले.

टेक्‍सास प्रांतात झालेल्या मुसळधार पावसाचा "हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या आयोजकांच्या मनावर कोणताही परिणाम झाला नसून, त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच सुमारे 50 हजार अमेरिकी-भारतीय उपस्थित राहणार आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू पोप वगळता इतर कोणत्याही परदेशी पाहुण्याच्या कार्यक्रमाला झालेली ही सर्वांत मोठी गर्दी असेल. "हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आज (ता. 22) अमेरिकेतील सर्वांत मोठ्या स्टेडियमपैकी एक असलेल्या एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमारे दीड हजार स्वयंसेवक झटत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi presented example of cleanliness surprised himself by picking up fallen flowers