दहशतवादाला तोंड देण्यासाठी एकत्र या : मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

ब्रिक्स देशांनी आपापसांत ताळमेळ ठेवला तर काही निर्णयांवर अंकुश ठेवता येईल, तसंच दहशतवादाला तोंड द्यायचे असल्यास आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, असेही मत मोदींनी यावेळी मांडले. 

ओसाका : 'दहशतवाद हा माणासाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि त्याच्याशी लढणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे,' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या जी 20 परिषदेच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. यंदाची जी 20 परिषद जपानमधील ओसाका येथे आजपासून सुरू झाली. यात दहशतवाद हाच माणुसकीचा शत्रू असल्याचे मोदींनी म्हटले. 

modi

'दहशतवादाचा परिणाम हा फक्त निष्पापांचे बळी घेण्यापुरता होत नाही, तर त्यामुळे विकासाच्या गतीवर व सामाजिक समानतेवर होतो. तसेच
दहशतवाद आणि जातीयवाद रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,' असेही मोदींनी यावेळी सांगितले. जगासमोरील आव्हांनांबाबतही यावेळी चर्चा झाली. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, व्यापरविषयक अनिश्चितता, बहुराष्ट्रीय व्यापाऱ्यांबाबत घेतले जाणारे एकतर्फी निर्णय, साधनसंपत्तीची कमतरता अशा अनेक गोष्टींवर मोदींनी यावेळी भाष्य केले.

ब्रिक्स देशांनी आपापसांत ताळमेळ ठेवला तर काही निर्णयांवर अंकुश ठेवता येईल, तसंच दहशतवादाला तोंड द्यायचे असल्यास आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, असेही मत मोदींनी यावेळी मांडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi speaks against terrorism in brics G20 summit at Osaka Japan