तब्येत बिघडलीय, पुन्हा अपहरण होऊ शकतं; मेहुल चोक्सीला भीती

तब्येत बिघडलीय, पुन्हा अपहरण होऊ शकतं; मेहुल चोक्सीला भीती
Summary

पंजाब नॅशनल बँक घोटाळा करून पळून गेलेला हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी आपलं पुन्हा अपहरण होण्याची भीती व्यक्त केली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा करून पळून गेलेला हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी आपलं पुन्हा अपहरण होण्याची भीती व्यक्त केली आहे. माझे पुन्हा एकदा अपहरण करून गुआनाला नेलं जाण्याची भीती त्याने व्यक्त केली असून दावा केला की, याआधीही मला अवैधरित्या गुआनाला नेण्यात आलं होतं.

मेहुल चोक्सीने म्हटलं की, माझं पुन्हा एकदा अपहरण केलं जाऊ शकतं आणि गुआनाला नेलं जाण्याची शक्यता आहे. तिथे अनेक भारतीय राहतात. मला बेकायदेशीर आणि अवैधरित्या भारतात नेण्याची शक्यता आहे. तब्येत बिघडल्यानं मी सध्या अँटिग्वातील घरात आहे. मला वाटतं की, पुन्हा एकदा अपहरण करून गुआनातून मला भारतात नेलं जाऊ शकतं.

माझ्या मानसिक आरोग्यसाठी मी मदत मागत आहे. कारण मी घाबरलो आहे. गेल्या काही महिन्यांत आलेल्या अनुभवांमुळे मला धक्का बसला आहे. मी डॉक्टरांनी शिफारस केल्यानंतरही घरातून बाहेर पाऊल टाकू शकत नाही. आता मी सर्वांसमोर येणं टाळतो, माझ्या तब्येतीमुळे मला बाहेर कुठं जाता येत नसल्याचंही चोक्सीने म्हटलं आहे.

माझे वकील अँटिग्वा आणि डोमिनिका दोन्ही खटल्यात कायदेशीर लढाई लढत आहेत. मला विश्वास आहे की मी जिंकेन, कारण मी अँटिग्वाचा नागरिक आहे. मला माझ्या ईच्छेविरुद्ध एका दुसऱ्या देशात अपहरण करून नेण्यात आलं होतं असा आरोप मेहुल चोक्सीने पुन्हा एकदा केला.

मेहुल चोक्सीला भारतात सीबीआय आणि ईडीने वाँटेड घोषित केलं आहे. त्याच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळा प्रकरणाचा आरोप आहे. पीएनबीमध्ये १३ हजार ५७८ कोटींचा घोटाळा झाला होता. त्यात ७ हजार कोटींचा घोटाळा चोक्सीने केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com