
पोलिसांच्या ताफ्यामध्ये एक घोडा आहे. या घोड्याला चहाची सवय असून, सकाळी एक कप चहा पिल्याशिवाय तो उठतच नाही. गेल्या 15 वर्षांपासून तो दररोज एक कप चहा पितो. घोडा चहा पित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे.
लंडनः पोलिसांच्या ताफ्यामध्ये एक घोडा आहे. या घोड्याला चहाची सवय असून, सकाळी एक कप चहा पिल्याशिवाय तो उठतच नाही. गेल्या 15 वर्षांपासून तो दररोज एक कप चहा पितो. घोडा चहा पित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे.
इंग्लडमधील मर्सिसाइड पोलिसांच्या ताफ्यात जॅक नावाचा घोडा आहे. जॅकचे वय 20 वर्षे असून, तो 15 वर्षांपासून दररोज एक कप चहा पितो. चहा पिल्याशिवाय त्याचा दिनक्रम सुरूच होत नाही. घोडा चहा पित असल्याचा व्हिडिओ ट्टिटरवर अपलोड झाल्यानंतर लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून घोड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
We have a new episode of #wintermorningwakeups featuring Jake. Jake refuses to get out of bed until he is brought a warm cup of @tetleyuk tea. Once he has drank this he is ready for the day. #StandTall #PHJake #NotStandingAtAll #BrewInBed #TeaTaster pic.twitter.com/iJXm32hlad
— Mer Pol Mounted (@MerPolMounted) November 20, 2019
मर्सिसाइड पोलिस ठाण्यामध्ये अनेक अधिकारी येऊन गेले. सर्व अधिकाऱयांना जॅकची सवय माहित आहे. यामुळे दररोज त्याला एक कप चहा देण्यास कोणीही विसरत नाही. पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी जॅकला मोठ्या आनंदाने न चुकता दररोज सकाळी एक कप चहा आणून देतात. जॅकचे चहा पिवून झाले की तो तत्काळ तयार होतो.
मर्सिसाइड पोलिस ठाण्यातील घोड्यांचे प्रशिक्षक लिंडसे गावेन म्हणाले, 'आमच्या ताफ्यामध्ये 12 घोडे आहेत. जॅक पुढील वर्षी निवृत्त होत आहे. पण, त्याच्या चहाची सवय पुढेही कायम राखली जाईल.'