पोप फ्रान्सिस यांच्याकडून दोघांना संतपद बहाल 

पोप फ्रान्सिस यांच्याकडून दोघांना संतपद बहाल 

व्हॅटिकन सिटी (पीटीआय) : ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी साल्वाडोरचे आर्चबिशप ऑस्कर रोमेरो आणि पोप पॉल सहावे यांना आज संतपद बहाल केले. या कार्यक्रमाला हजारो ख्रिस्ती भाविक उपस्थित होते. 

'पॉल सहावे आणि ऑस्कर अर्नुल्फो रोमेरो गाल्डामेज यांना संतपद बहाल करत असल्याचे मी जाहीर करतो. संपूर्ण रोमन कॅथोलिक चर्च संस्थेने या दोघांना तसा मान देण्याचा मी आदेश देतो,' असे पोप फ्रान्सिस यांनी जाहीर करताच भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ऑस्कर रोमेरो हे एल साल्वाडोरचे चौथे आर्चबिशप होते. 

गरिबी, हत्या, सामाजिक अन्याय या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांची 1980 मध्ये चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना हत्या करण्यात आली होती. पोप पॉल यांच्यावरही 1970 मध्ये मनिला येथे प्राणघातक हल्ला झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com