1920 मध्ये पाठवलेलं पोस्टकार्ड 100 वर्षांनी मिळालं; पत्त्यावर पोहोचलं पण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

पत्रात कडाक्याचा थंडीचा, आईच्या गुडघेदुखीचा व पत्र लिहिताना घरातील वातावरणाचा उल्लेख असून आजी व आजोबांचा ख्यालीखुशालीही विचारली आहे.

वॉशिंग्टन - जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत टपाल विभागामार्फत १०० वर्षांपूर्वी पाठविलेले पत्र ते मंगळवारी (ता.८) त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर पोचल्‍याचे नुकतेच समोर आले. मिशिगन येथे राहणाऱ्या ब्रिटनी किच यांनी टपाल पेटी उघडली असता त्यात नेहमीची बिले व एका पोस्टकार्डासह काही पत्रे होती. यात एक पोस्टकार्डही होते. 

किच म्हणाल्या की, त्यावर २९ ऑक्टोबर १९२० अशी तारीख दिसली. पोस्टकार्डावर मी राहत असलेल्या मिशिगनमधील ब्लेडिंग शहराचाच पत्ता होता, पण हे पत्र रॉय मॅकक्विन यांच्या नावे होते. पोस्टकार्डावरील हस्ताक्षरही पुसट झाले होते.

मॅकक्विन नावाच्या चुलत बहिणीला लिहिलेल्या या पत्रात कडाक्याचा थंडीचा, आईच्या गुडघेदुखीचा व पत्र लिहिताना घरातील वातावरणाचा उल्लेख असून आजी व आजोबांचा ख्यालीखुशालीही विचारली आहे. तसेच पत्राला उत्तर पाठविण्याचे आर्जवही केले आहे. पत्रावर फ्लॉसी बर्गेस अशी सही आहे. 
The faded and weathered postcard has a postmark from Oct. 29, 1920. The person who wrote it asks whether a cousin ever got his pants fixed.

पोस्टकार्डावर अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असलेले एक सेंटवर टपाल तिकीट चिकटवलेले असून त्यावर जेम्सटाउन असा शिक्का आहे.हे पत्र किच यांच्या जन्मापूर्वी पाठविलेले आहे. या पत्रावर नमूद केलेल्या मॅकक्विन किंवा बर्गेस यांच्या नातेवाइकांचा किंवा या कुटुंबांना ओळखत असलेल्यांचा शोध घेण्यासाठी हे पत्र किच यांनी फेसबुक ग्रुपवर पोस्ट केले आहे.

हे वाचा - ट्रम्प यांच्या मुत्सद्दीपणाला यश! आणखी एका अरब राष्ट्राची इस्त्राईलसोबत मैत्री

टपाल विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, आमच्याकडे आलेली पत्रे हरविल्याचे व नंतर सापडल्याचे प्रसंग क्वचितच दिसतात. जुनी पत्रे व पोस्टकार्डाबाबत जी अनेकदा जुन्या बाजारातून, दुर्मीळ वस्तूंच्या दुकानातील किंवा अगदी ऑनलाइनवर खरेदी केलेली असतात, त्यांचा आमच्या प्रणालीत पुन्हा नोंद होते. त्यावर पत्ता व योग्य टपाल मूल्य असेल तर असे पत्र पुढे पाठविले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: postcard deliver after 100 year on address in america