पाकमध्ये 24 वर्षीय गर्भवती गायिकेची गोळी झाडून हत्या

वृत्तसंस्था
Thursday, 12 April 2018

इस्लामाबाद : सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या गायिकेने उभे राहून गाणे गाण्यास नकार दिल्यामुळे गायिकेची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली. समिना सिंधू उर्फ समिना समून (वय 24) असे हत्या करण्यात आलेल्या गायिकेचे नाव आहे.

पाकिस्तानमधील सिंध तालुक्यात असलेल्या कांगा गावात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समिना गाणे गात होती. यावेळी तारीक अहमद जातोई नावाच्या व्यक्तीने समिनाला उभे राहून गाणे सादर करण्याची मागणी केली. मात्र, गर्भवती असल्याने समिनाने शक्य नसल्याचे सांगितले.

मनोरंजनाच्या कार्यक्रमात रंगत आल्यानंतर काहींनी समिनावर पैसे उधळले. यानंतर ती उभी राहून गाणे सादर करु लागली. आपली मागणी धुडकावल्याच्या रागातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तारीकने समिनावर गोळी झाडली. समिनाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, गोळीबाराचा प्रकार कॅमेरात कैद झाला असून, हत्येच्या दोन दिवसांनी पाकिस्तानातील खासगी वृत्तवाहिनीने ही व्हिडिओ क्लीप दाखवली. पत्नी गर्भवती असल्याने समिनाच्या पतीने या प्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तारीकला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnant singer shot dead in pakistan