मतमोजणीविरोधात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चार राज्यांमध्ये याचिका

पीटीआय
Friday, 6 November 2020

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर असताना विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आधीच जाहीर केल्याप्रमाणे ही लढाई न्यायालयात नेली आहे. त्यामुळे मतदानाला दोन दिवस होऊनही अध्यक्षपदाबाबतची उत्सुकता आणखी किती दिवस ताणली जाणार, याचीही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर असताना विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आधीच जाहीर केल्याप्रमाणे ही लढाई न्यायालयात नेली आहे. त्यामुळे मतदानाला दोन दिवस होऊनही अध्यक्षपदाबाबतची उत्सुकता आणखी किती दिवस ताणली जाणार, याचीही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्रम्प यांनी मतपत्रिका मोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी गैरप्रकार झाल्याचा आरोप करत जॉर्जिया, मिशीगन, पेनसिल्वानिया येथे मतमोजणीविरोधात न्यायालयात दावा केला असून विस्कॉन्सिन येथे फेरमोजणीसाठी याचिका दाखल केली आहे. 

Image may contain: text that says "ही राज्ये महत्त्वाची प्राथमिक निकाल ज्यो बायडेन डोनाल्ड ट्रम्प इलेक्टोरल मते पेनसिल्वानिया ....... २० २६४ पैकी- विजयासाठी एकूण ५३८ २१४ २७० आवश्यक जॉर्जिया I.......R १६ उत्तर कॅरोलिना ......... १५ या राज्यात ट्रम्प न्यायालयात आधीच्या निवडणुकीतील विजेते _डेमोक्रॅटिक रिपब्लिकन नेवाडा EE.EE. अलास्का E.. विस्कॉन्सिन मिशीगन १६ AFP"

बायडेन यांनी मात्र निवडणूक प्रक्रियेवर विश्‍वास व्यक्त करत समर्थकांना सबुरीचा सल्ला दिला आहे. माध्यमांच्या अंदाजानुसार, बायडेन यांनी मिशीगन आणि विस्कॉन्सिन ही राज्ये खिशात घातली असून २० इलेक्टोरल मते असलेल्या पेनसिल्वानियामध्ये ट्रम्प यांनी आघाडी कायम राखली आहे. मतपत्रिकांची मोजणी सुरु असल्याने आणि लढत फारच तुल्यबळ झाली असल्याने अंतिम निकाल हाती लागण्यास विलंब लागणार आहे. 

मतमोजणी उद्यापर्यंत
पेनसिल्वानियामध्ये आघाडी असतानाही ट्रम्प यांनी तीन दिवस उशिरापर्यंत मतपत्रिका स्वीकारण्याच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. येथे जवळपास ३१ लाख मतपत्रिका टपालाद्वारे आल्या आहेत. तीन नोव्हेंबरनंतर मतपत्रिका आल्या असतील तर निवडणूक अधिकारी शुक्रवारपर्यंत त्यांची मोजणी करू शकतात. त्यामुळे या राज्यातील निकाल येण्यासाठी आणखी एक दिवस वाट पहावी लागू शकते. 

राज्य आणि ट्रम्प यांचे आरोप

  • पेनसिल्वानिया : निर्धारित कालावधीनंतरही मतपत्रिका स्वीकारण्याच्या निर्णयाला आव्हान 
  • मिशीनग : मतमोजणी केंद्रात निरीक्षका परवानगी देईपर्यंत प्रक्रिया थांबविण्यासाठी याचिका
  • विस्कॉन्सिन : फेरमतमोजणीसाठी याचिका
  • जॉर्जिया : उशीरा आलेल्या मतपत्रिकांची नोंद ठेवण्यासाठी याचिका

तीन राज्ये महत्वाची
मिशीगन आणि विस्कॉन्सिन हातातून निसटल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता कायम राखण्यासाठी जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि नेवाडा या तीन राज्यांत विजय आवश्‍यक आहे. मिशीगन आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडेन विजयी झाल्याचा प्राथमिक निकाल माध्यमांनी जाहीर केला असला तरी येथे अद्यापही मोजणी सुरु आहे. त्यात गैरप्रकार झाल्याचा दावा करत ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Donald Trumps petition in four states against the vote count