अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

ट्रम्प यांच्या प्रशासनात एक महिन्यापूर्वीच फ्लिन यांची नियुक्ती करण्यात आली होती. फ्लिन यांना ट्रम्प यांचा विश्वासू साथीदार मानण्यात येत होते.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील रशियाच्या राजदूतांशी संपर्क ठेवणारे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी राजीनामा दिला. 

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, फ्लिन यांचा राजीनामा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूर केला आहे. फ्लिन यांनी आपला राजीनामा देताना अध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष माईक स्पेन्स यांची माफी मागत राजीनामा स्वीकारावा असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या प्रचाराच्या काळात त्यांना सल्ला देणारे केथ केलाँग यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. 

ट्रम्प यांच्या प्रशासनात एक महिन्यापूर्वीच फ्लिन यांची नियुक्ती करण्यात आली होती. फ्लिन यांना ट्रम्प यांचा विश्वासू साथीदार मानण्यात येत होते. फ्लिन यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे, की मी अमेरिकी प्रशासनाला रशियन राजदूतांसोबत असलेल्या संबंधांबाबत पूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे मी माफी मागत राजीनामा देत आहे.

Web Title: President Trump's National Security Adviser Michael Flynn has Resigned