चीनला धडा शिकवण्यासाठी आता वेगळ्या मार्गाने जाऊ; अमेरिकेचा गंभीर इशारा

वृत्तसंस्था
Tuesday, 7 July 2020

चीनसोबत आता वेगळ्या पद्धतीने वागावं लागेल. चीनमधील लोकांना राजनैतिक स्वतंत्रता मिळवून देण्याच्या अपेक्षेने त्यांना अनेक आर्थिक संधी देण्यात आल्या आहेत. मात्र, ही नीती कामाला आली नाही, असं पोम्पिओ म्हणाले आहेत

वॉशिंग्टन- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनसोबत आता वेगळ्या पद्धतीने वागावं लागेल. चीनमधील लोकांना राजनैतिक स्वतंत्रता मिळवून देण्याच्या अपेक्षेने त्यांना अनेक आर्थिक संधी देण्यात आल्या आहेत. मात्र, ही नीती कामाला आली नाही, असं पोम्पिओ म्हणाले आहेत. ते 'वॉशिंग्टन वॉच' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. 

इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप; 6.1 तीव्रतेची नोंद
चीनला अनेक आर्थिक संध्या देण्यात आल्या. चीन आपल्या नागरिकांना राजनैतिक स्वतंत्रता आणि मूलभूत अधिकार प्रदान करेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. आमची जूनी नीती कामाला आली नाही. मी माजी शासकांवर टीका करत नाहीय, पण आपण स्पष्ट पाहू शकतो की आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे अमेरिकाला आता वेगळा मार्ग अवलंबवा लागेल, असं ते म्हणाले आहेत.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनाही असाच मार्ग प्रशस्त वाटतोय. ट्रम्प चीनबाबत वेगळा विचार करणारे पहिले राष्ट्रपती आहेत. त्यांचा हा निर्णय पक्षपातीपूर्ण असणार नाही. त्यांच्या आधी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रपतींनी चीनला अमेरिकेसोबत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या, पण अमेरिकेला याचे नुकसान सहन करावे लागले आहे. अमेरिकेचा मध्यमवर्ग, कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावून त्याची किंमत चुकवली आहे. अमेरिकेला यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच चीनमधील लोकानांसोबतही योग्य व्यवहार केला जात नाही, असं पोम्पियो म्हणाले आहेत.

मोठी बातमी ! "सन्मान निधी'त त्रुटी; शेतकऱ्यांच्या खात्यांची होणार...
पोम्पियो यांनी हाँगकाँगमध्ये लागू करण्यात आलेल्या सुरक्षा कायद्यावरही भाष्य केलं. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगच्या लोकांचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्यात आले आहे. चीनसोबत आम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. पण, चिनी सरकारचा आम्हाला खरा चेहरा माहित आहे. चीन आपल्या लोकांसोबत योग्य व्यवहार करत नाही, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, टिकटॉकसह अन्य चिनी अॅप्सवर बंदी आणण्यासाठी अमेरिका गंभीरतेने विचार करत आहे. पोम्पियो यांनी याबाबतचे सुतोवाच केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे चीन विरोधात जगात वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: previous police against china did not work said america