इम्रान खान यांची अमेरिका वारी स्वस्तात; आठ पटीने खर्च कमी

इम्रान खान यांची अमेरिका वारी स्वस्तात; आठ पटीने खर्च कमी

इस्लामाबाद ः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे गेल्या महिन्यात अमेरिकेला भेट दिली. यांच्या या पहिल्या अमेरिका दौरा माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दौऱ्यापेक्षा आठ पटीने स्वस्तात झाला आहे. इम्रान खान यांच्या या दौऱ्यासाठी 67 हजार 180 डॉलर खर्च आल्याची माहिती पाकिस्तान सरकारने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

इम्रान खान यांचा अमेरिका दौरा तीन दिवसांचा होता. या काळातील खर्चाची माहिती गुरुवारी (ता. 1) जाहीर करण्यात आली. खान यांच्याबरोबर 27 सदस्यांचे शिष्टमंडळ होते. या दौऱ्यासाठी इम्रान खान यांनी खासगी विमानाऐवजी "कतार एअरवेज' या व्यावसायिक कंपनीच्या विमानाचा वापर केला. प्रवासादरम्यान ता दोहा येथे थांबले होते.

अमेरिकेत इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या राजदूताच्या अधिकृत निवासस्थानी मुक्‍काम केला होता. या संपूर्ण दौऱ्यासाठी 67 हजार 180 डॉलर खर्च आला. माजी पंतप्रधान नवाज शरीफ सत्तेवर असताना 2013मध्ये त्यांनी अमेरिका दौरा केला होता. यासाठी त्यांनी पाच लाख 49 हजार 854 डॉलर खर्च केले होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख असीफ अली झरदारी यांची 2009 मधील अमेरिका वारी सात लाख 52 हजार 682 डॉलर एवढ्या खर्चात झाली. 


इम्रान खान यांचा खर्च (आकडे डॉलरमध्ये) 
8, 408 हॉटेल निवास 

37,371 प्रवास 

884 भेटवस्तूसाठी 

8,097 नाश्‍ता व भोजन 

4,360 टीप व इतर खर्च 

अमेरिका दौऱ्यावरील एकूण खर्च (आकडे डॉलरमध्ये) 
67,180 इम्रान खान 

5,49,854 नवाज शरीफ 

7,52,682 असीफ अली झरदारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com