भारताचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जगात सर्वात चांगला : पंतप्रधान मोदी

सूरज यादव
Friday, 17 July 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डिजिटल माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत मार्गदर्शन करत आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डिजिटल माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच या मंचावरून बोलणार आहेत. याआधी जानेवारी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ECOSOC च्या 70 व्या वर्धापनदिनी भाषण भाषण दिलं होतं. 

काय म्हणाले मोदी ?

- यंदा आपण संयुक्त राष्ट्राचे 75 वे वर्ष साजरे करत आहे.
- मानवाच्या प्रगतीमध्ये संयुक्त राष्ट्राचं मोठं योगदान 
- दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राच्या 50 संस्थापक सदस्यांमध्ये भारत होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या. आता संयुक्त राष्ट्रात 193 सदस्य आहेत.
-जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला
- 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे स्वत:चं घर असेल
- आम्ही गावा गावात शौचालय बांधले
- आम्ही गरीब जनतेसाठी घरं बांधली
- जन धन खात्यातून जवळपास 40 लाख खाती उघडण्यात आली
- आम्ही देशाच्या विकासासाठी काम करत आहे.
- गरीबांसाठी आयुष्यमान भारत योजना आणली

हे वाचा - भारतात गरीबी कमी झाली; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

मोदी म्हणाले की, जगातील एकूण लोकसंख्येच्या सहावा भाग लोक भारतात राहतात. आम्हाला आमचे महत्व आणि जबाबदाऱ्या माहिती आहेत. आम्ही विकासाचे लक्ष्य पूर्ण केले तर जागतिक लक्ष्य पूर्ण होण्यास मदत मिळेल.  आम्ही 2025 पर्यंत क्षयरोग पूर्णपणे संपवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विकासाच्या मार्गाने पुढे जाताना आम्ही जगात उद्भवणारे प्रश्न त्यांच्या जबाबदाऱ्या विसरलो नाही. गेल्या काही वर्षात आम्ही वर्षाला जवळपास 38 मिलियन टन कार्बनचे उत्सर्जन कमी केलं आहे असंही मोदींनी सांगितलं. 

हे वाचा - कोरोना उठलाय जिवावर; देशात इतर रुग्णांकडं दुर्लक्ष, रोज 1300 जणांचा होतोय मृत्यू

गेल्या वर्षी आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली. यावेळी भारतातील 6 हजार गावांमध्ये पूर्ण सॅनिटायझेशन करण्याचं लक्ष्य पूर्ण केल्याचं मोदींनी म्हटलं. भूकंप, चक्रीवादळ, अबोला तसंच इतर कोणतंही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट असो भारतानं यावर वेगानं नियंत्रण मिळवलं. कोरोनाविरुद्ध आमचं युद्ध सुरु असून आतापर्यंत भारताने 150 हून अधिक देशांना वैद्यकिय मदत दिली असे मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prime minister narendra modi live in UNESC