भारत आणि चीनच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

''भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार आहे. उभय नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे''. 

- शी जिनपिंग, राष्ट्रपती, चीन

हुआन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी हुवेई येथील मर्किस संग्रहालय येथे आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी मोदी म्हणाले, ''भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार आहे. उभय नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे''. 

हुवेई येथील मर्किस संग्रहालयात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर मोदी म्हणाले, भारत आणि चीन दोन्ही देश मिळून संपूर्ण जगाला समृद्ध करेल.  दोन्ही देशातील नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे. येत्या काळात भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होता तेव्हा मला हुआनला येण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी एका अभ्यासदौऱ्यासाठी आलो होतो. तसेच 2019 मध्ये भारतात अशाप्रकारच्या अनौपचारिक समिटचे आयोजन केल्यास मला आनंद होईल, असेही मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi Meets Chinese President Xi Jinping At Hubei