सुरक्षारक्षकाला मारून 174 कैदी पळाले 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

हैती : हैतीच्या उत्तरेकडील कारागृहात सुरक्षारक्षकाला ठार मारून 174 कैदी पळाल्याची घटना उघडकीस आली. या कैद्यांनी बंदुकाही चोरल्या असून, त्यांच्या शोधासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतांच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली आहे. 

काल पोलिसांनी कारागृहाकडून येणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभे केले असता अनेक जण ओळखपत्रांशिवाय आढळून आले. दरम्यान, कारागृहातील 266 कैदी गणवेश घालत नसल्याने कारागृहातून पळून जाणे सहजशक्‍य झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या कैद्यांनी पाच ते सहा रायफली चोरल्या व तेथून पळ काढताना एका सुरक्षारक्षकाला गोळी घातली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर हैतीचे न्यायमंत्री कॅमिली एडवर्ड ज्युनिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार कैद्यांच्या पलायनादरम्यान भिंतीवरून उडी मारताना एक कैदी डोक्‍यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. 

Web Title: prisoners escape from haiti

टॅग्स