न्यायाधीश नियुक्तीच्या मुद्दयावर जनतेने निराश होऊ नये: कमला हॅरिस

पीटीआय
Wednesday, 30 September 2020

न्यायाधीशांची नियुक्ती करताना जनमताचा आदर राखला गेला नाही आणि त्यामुळे जनतेने हताश होऊ नये, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.

रालेघ (अमेरिका) - अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशाच्या नियुक्तीचा मुद्दा गाजत आहे. न्यायाधीशांची नियुक्ती करताना जनमताचा आदर राखला गेला नाही आणि त्यामुळे जनतेने हताश होऊ नये, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी म्हटले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून ट्रम्प प्रशासनाला जनतेच्या मताला महत्त्व नाही, हे दाखवून द्यायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश रुथ बादर गिन्सबर्ग यांचे निधन झाल्याने रिक्त जागेवर अध्यक्ष ट्रम्प यांनी एमी कोनी बॅरेट यांची नियुक्ती केली. यासंदर्भातील एका सर्वेक्षणात ५६ टक्के अमेरिकी नागरिकांनी न्यायधीशांची नियुक्ती अमेरिकी निवडणुकीनंतर करायला हवी होती, असे मत नोंदवले तर ४१ टक्के नागरिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मतदारांच्या मते, या पदावर नेमणूक करण्यासाठी ज्यो बायडेन अधिक सक्षम आहेत. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: public should not be disappointed on the issue of appointment of judges says Harris